बार कौन्सिल निवडणूक २०२६ : ॲड. अनुराधा दिनेश येवले यांना मतदान करण्याचे आवाहन
आष्टी | प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक २०२६ अंतर्गत महिला सदस्य (राखीव) पदासाठी अॅड. अनुराधा दिनेश येवले यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे दाखल केली आहे. सदर निवडणूक मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी होणार असून या निवडणुकीत त्यांनी वकिल बांधवांना प्रथम पसंती क्रमांक १ देण्याचे आवाहन केले आहे.
अॅड. अनुराधा येवले या अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यरत वकील असून त्यांनी विविध सामाजिक व विधी क्षेत्रातील जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्या बाल कल्याण समिती (Bench of Magistrates) सदस्य म्हणून तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी अहिल्यानगर वकील संघात महिला सचिव तसेच खजिनदार पदाची जबाबदारीही यशस्वीपणे निभावली आहे.
वकिलांच्या हितासाठी, न्यायव्यवस्थेतील सुधारणा, महिला वकिलांचे प्रतिनिधित्व आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा सेवा संघाचे आष्टी तालुका अध्यक्ष इंजि. तान्हाजी (बापू) जंजीरे यांनीही या निवडणुकीत अॅड. अनुराधा येवले यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “विधी क्षेत्रात सक्षम नेतृत्व निर्माण होण्यासाठी व महिला प्रतिनिधित्व वाढण्यासाठी अॅड. येवले यांना वकिलांनी प्रथम पसंतीचे मत द्यावे.”
बार कौन्सिल निवडणुकीत सर्व वकिलांनी मोठ्या संख्येने मतदान करून योग्य उमेदवारास पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.


stay connected