*वाटा संघर्षाच्या राजेंद्र उदागे गौरव ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन*
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शब्दगंधचे अध्यक्ष तथा नंदराज केटरर्सचे संचालक राजेंद्र उदागे यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या “वाटा संघर्षाच्या : राजेंद्र उदागे गौरव ग्रंथ” या विशेष ग्रंथाचे प्रकाशन शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जाधव लॉन्स, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास आमदार संग्रामभैया जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार व ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे, अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर तसेच संत साहित्य अभ्यासक गोरक्षनाथ महाराज उदागे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय कॉ. बाबा आरगडे, प्रा. मधुसूदन मुळे, जयंत येलूलकर, जयंतभैया जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुनील गोसावी संपादित या गौरव ग्रंथामध्ये राजेंद्र उदागे यांनी स्वतः लिहिलेला आत्मचरित्रात्मक लेख समाविष्ट असून कविवर्य प्रकाश घोडके, शशिकांत नजान, प्रा.सिताराम काकडे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, डॉ. शेषराव पठाडे, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, सुमेध ब्राह्मणे, डॉ. सुनीलकुमार सरनाईक, शर्मिला रूपटक्के, मकरंद घोडके, विनोद शिंदे, श्रीनिवास बोजा, डॉ.जी.पी.ढाकणे, ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे,डॉ. संजय सुकाळकर, संदीप रोडे, डॉ.अनिल गर्जे, प्रा.डॉ.किशोर धनवटे,अमोल उदागे, सौ. मीरा उदागे यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. या लेखांमधून राजेंद्र उदागे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि व्यावसायिक वाटचालीचा संघर्षमय प्रवास उलगडण्यात आला आहे.
या गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास साहित्यिक, साहित्य रसिक तसेच सर्व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भगवान राऊत, शाहीर भारत गाडेकर, बबनराव गिरी, रवींद्र दानापुरे, शर्मिला गोसावी, राजेंद्र फंड, राजेंद्र चोभे, प्रा. डॉ. अशोक कानडे, प्रशांत सूर्यवंशी, स्वाती ठुबे, जयश्री झरेकर, शेवगाव तालुका शाखा अध्यक्ष हरिभाऊ नजन, कोपरगाव तालुका शाखा अध्यक्ष सौ. ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, आष्टी तालुका शाखा अध्यक्ष बाळासाहेब शेदूरकर यांनी केले आहे.


stay connected