'माणसं अशी.. अन् तशीही' कथासंग्रहाचे प्रकाशन सातारा येथे ग्रामीण साहित्य संमेलनात होणार..

 'माणसं अशी.. अन्  तशीही' कथासंग्रहाचे प्रकाशन सातारा येथे ग्रामीण साहित्य संमेलनात होणार..





हातकणंगले प्रतिनिधी:-रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित रयत शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी कॉलेज बॅरिस्टर पी जी पाटील सभागृह सातारा येथे राज्यस्तरीय २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सदर साहित्य संमेलनात 'माणसे अशी.. अन तशीही'.. हा बाळासाहेब देशमुख कथा लेखक अहिल्यानगर यांच्या   कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक डॉ. शिवाजी शिंदे , सहाय्यक कुलसचिव अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे. समाजात वेगवेगळ्या प्रवृत्तीचे , स्वभावाचे, कलागुणांचे, बेरकी, खरलनायकी  वृत्तीचे, नाना प्रकारचे, नाना लोक  वावरत असतात. त्यांच्या प्रत्येक गुणांवर , प्रत्येक व्यक्तींवर प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह आहे.



चांगल्या व्यक्तींकडून आदर्श घेणे वाईट व्यक्तींपासून दूर राहणे. ही साधी शिकवण, आपल्याला या पुस्तकाकडून मिळते.

बाळासाहेब देशमुख यांचा या अगोदर 'रंग माझा वेगळा'.. हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे.

बाळासाहेब देशमुख यांचे कथा लेखना बरोबर, कथाकथनचे कार्यक्रम , संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असतात. 

प्रकाशन सोहळा सौ सुमन गजानन देसाई मीरा-भाईंदर मुंबई, प्रा राजेंद्र सुंदरदास फंड राहता अहिल्यानगर, डॉ श्रीकांत पाटील कादंबरीकार घुणकी,  दिपक पवार रुकडी आदि उपस्थित मान्यवरांच्या समवेत  प्रकाशन होत आहे. देशमुखांचे साहित्य लेखन विविध दैनिक व दिवाळी अंक मधून प्रसिद्ध झालेले आहे.अशी माहिती कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.