विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पॉलिटेक्निक आष्टीचा सलग तीन वर्षांचा हॅटट्रिक विजय; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पॉलिटेक्निक आष्टीचा सलग तीन वर्षांचा हॅटट्रिक विजय; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड




आष्टी। प्रतिनिधी 

आनंद चॅरिटेबल संस्था संचलित डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक आष्टी या महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने शैक्षणिक वर्ष 2023-24, 2024-25 व 2025-26 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित G-1 झोन विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकावत ऐतिहासिक हॅटट्रिक विजय नोंदविला आहे. या दैदीप्यमान यशाच्या जोरावर आनंद चॅरिटेबल संस्था संचलित डिप्लोमा इन इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) आष्टीच्या संघाची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या विभागीय स्पर्धेत पॉलिटेक्निक आष्टीच्या संघाने प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळ, संघभावना, शिस्त व तांत्रिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात बलाढ्य प्रतिस्पर्धी संघावर मात करत संघाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

या विजयी १२ खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व संघनायक ढोले श्रेयश परशुराम यांनी प्रभावीपणे केले. संघात कदम ओंकार अविनाश,शेख नुमान निसार, मुरकुटे गौरव सचिन, मिसाळ ज्ञानेश्वर रामदास, जैदी आमेर इस्लाम, खान साद याह्या, भालेराव महेश विष्णू, मिसाळ शत्रुघ्न मच्छिंद्र, पोकळे युवराज नारायण, मुरकुटे श्रीनाथ संतोष व मिर्झा शोएब आसिफ बेग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संघाच्या या यशामागे क्रीडा प्रशिक्षक प्रा. योगेश पवार यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.

या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. भीमराव धोंडे, संचालक डॉ. अजय  धोंडे, तसेच प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ. डी. बी. राऊत, एस. जी. विधाते, डी. झेड. बोडखे, सागर वाघुले, संदीप नन्नवरे  डिप्लोमा इन इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य प्रा. संजय बोडखे यांनी संघाचे अभिनंदन केले.

यावेळी संस्थेअंतर्गत महाविद्यालयांचे प्राचार्य — छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरसूल श्रीराम, महेश आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी, महेश अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रागीट सतीशचंद्र, अन्न तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. साईनाथ मोहळकर आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनीही संघाच्या कामगिरीचे कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सलग तीन वर्षांच्या या हॅटट्रिक विजयानिमित्त आनंद चॅरिटेबल संस्था संचलित डिप्लोमा इन इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) आष्टीच्या क्रीडा परंपरेला अधिक बळ मिळाले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही संघ भरीव यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.