जिल्हा स्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी,पुणे~३५शाळेचे भरघोस यश.
आकुर्डी: जिल्हा स्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी,पुणे ३५ शाळेतील इयत्ता ६ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत यशाची परंपरा चालू ठेवली.श्री फत्तेचंद जैन विद्यालयाने या मेळाव्याचे यशस्वी आयोजन व नियोजन केलेले होते.यात एकूण ३९ शाळेतील १०३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यात एकूण ११ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील १)तंबू निरीक्षण स्पर्धेत ,स्काऊट विभाग,तृतीय क्रमांक,२) भव्य शेकोटी स्पर्धा: स्काऊट विभाग,धनगरी नृत्य: द्वितीय क्रमांक,३) शोभा यात्रा: स्काऊट व गाईड विभाग: उत्तेजनार्थ नंबर.
या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक मा.डॉ.गोविंदराव दाभाडे सरांनी केले.तर स्काऊट प्रमुख श्री.कैलास कोशिरे सर, गाईड प्रमुख सौ.प्रतिमा काळे मॅडम व श्री.राहुल वांगेकर सर,सौ. सुकन्या जाधव मॅडम यांनी सहकार्य केले.संस्थेच्या,शाळेच्या,पालकांच्या व मा.प्राचार्या सौ.संगीता गुरव मॅडम,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षक श्री.संजय कांबळे सर व सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आले.


stay connected