म.रा.आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 च्या लातूर जिल्हाध्यक्षपदी किरण काटे तर सचिवपदी व्यंकटेश काळे यांची निवड

 म.रा.आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 च्या लातूर जिल्हाध्यक्षपदी किरण काटे तर सचिवपदी व्यंकटेश काळे यांची निवड


                                                        

नांदेड ( चंद्रकांत वाघमारे) 

➖ म.रा.आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 या संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी किरण काटे यांची व सचिवपदी व्यंकटेश काळे यांची निवड करण्यात आली.संघटनेचे राज्याध्यक्ष दिनानाथ जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सचिव सुरेशदादा आरगुलवार, राज्य उपाध्यक्ष वसंतराव शिरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची नुकतीच एक बैठक शहरातील पत्रकार भवन येथे पार पडली.या बैठकीत निवड करण्यात आलेल्या उर्वरित कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन भोसले, कोषाध्यक्षपदी संतोष कुरील, जिल्हा सहसचिवपदी आशिष वाघमारे,औसा तालुकाध्यक्षपदी विश्वनाथ शिंदे, उपाध्यक्षपदी रवि कांबळे यांची निवड करण्यात आली.या बैठकीत महिला जिल्हाध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड करण्यात आली.यावेळी निवड करण्यात आलेल्या संघटना पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संघटनेचे राज्याध्यक्ष दिनानाथ जोंधळे, राज्य सचिव सुरेशदादा आरगुलवार, राज्य उपाध्यक्ष वसंतराव शिरसे, लातूर जिल्हा आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन स्वामी,मराठवाडा अध्यक्ष संजयदादा चोरमले ,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष कान्होबाराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या बैठकीच्या आयोजनासाठी मराठवाडा अध्यक्ष संजयदादा चोरमले यांनी विशेष परिश्रम घेऊन बैठकीचे सुत्रसंचलन केले.संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष किरण काटे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तात्काळ दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी संघटना कटीबद्ध असल्याचे अभिवचन दिले.या बैठकीत दिनानाथ जोंधळे, सुरेशदादा आरगुलवार, वसंतराव शिरसे, कान्होबाराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीचे प्रास्ताविक संतोष माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशिकला काळे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.