काळानुरूप व्यवसाय शिक्षण घेण्याची गरज- मिर्झा नियामत बेग -------------------------------------------- निरोप समारंभा प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी मौन ठेवून वाहिली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

 काळानुरूप व्यवसाय शिक्षण घेण्याची गरज- मिर्झा नियामत बेग 



--------------------------------------------
निरोप समारंभा प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी मौन ठेवून वाहिली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली


--------------------------------------------

आष्टी/ प्रतिनिधी 


बदलत्या काळानुसार व्यवसायभिमुख शिक्षण घेऊन जगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वतःचे स्थान टिकण्यासाठी व्यवसाय शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण सभापती नियामत बेग यांनी आष्टी येथील महात्मा गांधी विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या निरोप समारंभा प्रसंगी केले.

काल आष्टी येथील तंजीमे तरक्की शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय आष्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवातच दिवंगत उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या झालेल्या अपघाती निधनाने सर्वत्र शोककळा पसरल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शाळेच्या वतीने दोन मिनिट मौन धारण करून विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना उदबोधन करताना बेग म्हणाले की सध्या स्पर्धेचे युग आहे स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा सोबत व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे लागणार आहे यावेळी या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आष्टी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राध्यापक डीडूळ सर, आझाद उर्दू हायस्कूल आष्टीचे  मुख्याध्यापक फारुकी एम .आय. मिर्झा हाश्मतुला उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेख नसरीन बाजी व शाळेचे मुख्याध्यापक जावेद पठाण उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन साधना गायकवाड , व आरती चव्हाण यांनी केले तर आभार शाळेतील  शिक्षक हनुमंत पोकळे यांनी मानले हा कार्यक्रम नववी च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. या शाळेतील शिक्षक संतोष सायकड, अर्चना हजारे, संदेश जगताप, शेख वसीम, शेख वाहेद भाई, आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.