उद्योजक हरिभाऊ लगड यांचा पिंपरखेड शाळेसाठी प्रेरणादायी उपक्रम शाळेसाठी प्रिंटर देऊन कॉम्प्युटर देण्याची केली घोषणा

 उद्योजक हरिभाऊ लगड यांचा पिंपरखेड शाळेसाठी प्रेरणादायी उपक्रम 
शाळेसाठी प्रिंटर देऊन कॉम्प्युटर देण्याची केली घोषणा



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यातील हिवरा गावचे भूमिपुत्र व पुणे येथील उद्योजक हरिभाऊ लगड यांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळखेड येथे स्वखर्चातून प्रिंटर भेट देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाची भर घातली. याच कार्यक्रमात त्यांनी शाळेसाठी कॉम्प्युटर देण्याची घोषणाही करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा स्तुत्य संकल्प व्यक्त केला.

विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची आस्था आणि शिक्षणाबद्दलची सकारात्मक दृष्टी ही या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. आजच्या डिजिटल युगात प्रिंटर व कॉम्प्युटरसारखी साधने शाळेसाठी अत्यंत आवश्यक असून, या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प, अभ्यासक्रम व विविध शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत.

या दातृत्वपूर्ण कार्याबद्दल शाळेच्या वतीने हरिभाऊ लगड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण समितीचे अध्यक्ष महादेव चव्हाण उपाध्यक्ष अंकुश आढागळे, शालेय शिक्षण समितीचे सदस्य सुरेश औटे, मुख्याध्यापक असलम शेख,सर अतुल चव्हाण सर, महादेव आमले सर, सतीश एकशिंगे सर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हरिभाऊ लगड यांच्या या समाजोपयोगी कार्याचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी अशा दानशूर व्यक्तिमत्त्वांचा हातभार अत्यंत महत्त्वाचा आहे. हरिभाऊ लगड यांचा हा उपक्रम इतर उद्योजकांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”

शाळा प्रशासनाच्या वतीने त्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच ग्रामस्थांनीही या दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणासाठी केलेले हे योगदान भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.