सुलेमान देवळा येथे शिवजयंतीनिमित्त ‘कलाविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन

 सुलेमान देवळा येथे शिवजयंतीनिमित्त ‘कलाविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन




आष्टी | प्रतिनिधी / राजु गायकवाड -

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सुलेमान देवळा (ता. आष्टी, जि. बीड) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त भव्य ‘कलाविष्कार’ विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. जयदत्त (भैय्या) धस, श्री. उध्दव (बापू) दरेंकर, श्री. अजय धोडे आणि श्री. यश (भैय्या) आजबे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या प्रसंगी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, विद्यार्थ्यांचे कलागुण दर्शन, शिवराज्याभिषेक सोहळा तसेच आकर्षक साऊंड सिस्टीम व भव्य स्टेजची व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यक्रमासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन स्वामी विवेकानंद पतसंस्था मर्या., कडा संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद आणि शिवजयंती उत्सव समिती सुलेमान देवळा यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या पावन पर्वावर आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.