हजयात्रा 2026 साठी जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व यात्रीयांसाठी 2,3,4 फेब्रुवारी रोजी मेडिकल स्क्रिनिंग आणि वॅक्सिनेशन कॅम्प Haj yatra

 *हजयात्रा 2026 साठी जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व यात्रीयांसाठी 2,3,4 फेब्रुवारी रोजी मेडिकल स्क्रिनिंग आणि वॅक्सिनेशन कॅम्प*




*हज 2026 साठी जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व हाजींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा : हाजी बी. एस मोहसीन*


बीड ( प्रतिनिधी)


हज कमिटी ऑफ इंडियन मुंबई तर्फे हज 2026 साठी जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व महिला व पुरुष यात्रियांसाठी तीन दिवसी 2, 3, 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत मेडिकल स्क्रिनिंग व वॅक्सिनेशन कॅम्प बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित केलेला आहे. हे  मेडिकल स्क्रिनिंग व वॅक्सिनेशन कॅम्प  हज कमिटी ऑफ इंडिया मुंबई तर्फे  येणाऱ्या हज ट्रेनर्स यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. 



सऊदी अरेबिया मध्ये दर वर्षी हज अदा करण्या साठी संपूर्ण जगा मधून 30 ते 40 लाख यात्री येतात. सऊदी अरेबिया येणाऱ्या यात्रियांसाठी संपूर्ण नियोजन करतात. या वर्षी सऊदी अरेबिया कडून येणाऱ्या यात्रियांसाठी नवीन निर्देश देण्यात आले की हज यात्रा साठी येणाऱ्या हजीना कोणत्याही प्रकारच्या गंभीर आजार नसावा. हाजी हेल्थी व पूर्ण पने फिट असावा. प्रत्येक हाजीना हज अदा करण्यासाठी दिनांक 8 जिल हिज्जा ते 12 जिल हिज्जा या 5 पांच दिवसात 30 ते 40 किलोमीटर पाय पाय चालावे लागतात. वेगवेगळ्या स्थानात वेगवेगळ्या आमाल कार्य करावा लागतो. या सर्व गोष्टी पाहून सौदी अरेबिया आणि हज कमिटी ऑफ इंडियन ने हज यात्रा साठी जाणाऱ्या यात्रायांची मेडिकल स्क्रिनिंग करण्याचे आदेश दिले आहे. हे मेडिकल स्क्रिनिंग बीड जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर करणार आहे. मेडिकल स्क्रिनिंग आणि वॅक्सिनेशन कॅम्प मध्ये प्रत्येक हाजीला एक एक मेडिकल हेल्थ कार्ड दिला जाईल. मेडिकल हेल्थ कार्ड मध्ये हाजींची मेडिकल तपासणीची सर्व माहिती राहील, मेडिकल कार्ड हे हज यात्रा मध्ये सर्वात आवश्यक डोकोमेंट्स आहे. प्रत्येक हाजी नी आपला आपला हेल्थ कार्ड काळजी पुर्वक संभाळून ठेवावे.बीड जिल्हा शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य विभागा कडून हज 2026 साठी जाणाऱ्या यात्रियानं साठी मेडिकल स्क्रिनिंग व वॅक्सिनेशन कॅम्प ची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.


हज 2026 साठी जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व यात्री साठी हज कमिटी ऑफ इंडिया ने मेडिकल स्क्रिनिंग अँड वेक्सिनेशन कॉम्प्लेसरी केलेला आहे. या मेडिकल स्क्रिनिंग कॅम्प मध्ये सर्व हजीयांची मेडिकल तपासणी होणार आहे. मेडिकल कॅम्प मध्ये येणाऱ्या सर्व हाजीयानी आपल्या सोबत 1. आधार कार,  2. दोन पासपोर्ट साइज फ़ोटो, 3. पासपोर्टची ज़ेरॉक्स कॉपी, 3. एप्लीकेशन फॉर्म सोबत दिलेल्या मेडिकल स्क्रिनिंग सर्टिफिकेट, 4. आपल्या जुन्या मेडिकल रिपोर्ट्स, 5. कोविड 19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट सोबत आणावे.



मागील तीन वर्षा पासून बीड जिल्हा खादीम उल हुज्जाज कमिटी हज यात्रा साठी जाणाऱ्या यात्रियानं, हाजी साठी वेगवेगळ्या उपक्रम करत आहे. सोशल मीडिया, व्हॉट्स ऍप च्या माध्यमातून हाजीयांचा मार्गदर्शन करणे, हाजींना येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या सोडवणे, हज कमिटी ऑफ इंडिया कडून येणाऱ्या सर्व माहिती देणे.  मागील एक महिन्या पासून हज यात्रेच्या विषय वर पुरुष व महिला यात्रियांची दररोज मार्गदर्शन शिबिर सुरू आहे. त्या मार्गदर्शन शिबिर मध्ये मेडिकल स्क्रिनिंग व वॅक्सिनेशन कॅम्प ची सर्व माहिती बीड जिल्हा खादीम उल हुज्जाज कमिटीच्या अध्यक्ष हाजी बी. एस मोहसीन यांनी  यात्रियांना , हाजींना दिली आहे.


हज 2026 साठी जाणाऱ्या सर्व यात्रियांनी , हाजींनी मेडिकल स्क्रिनिंग व वॅक्सिनेशन कॅम्प चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मेडिकल स्क्रिनिंग व वॅक्सिनेशन कॅम्प ची अधिक माहितीसाठी बीड जिल्हा खादीम उल हुज्जाज कमिटीच्या अध्यक्ष हाजी बी.एस. मोहसीन यांच्याशी संपर्क साधावा. 9272427393 असे आवाहन कमेटीचे अध्यक्ष हाजी बी.एस मोहसीन यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.