आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्ना संदर्भात पालकमंत्री ना.अजितदादांकडे माजी आ.भीमराव धोंडे यांची आग्रही मागणी

 आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्ना संदर्भात पालकमंत्री ना.अजितदादांकडे माजी आ.भीमराव धोंडे यांची आग्रही मागणी

---------------------------


विहीर,रस्ते,शेततलावासह पूल बंधारे आणि इतर विकासात्मक बाबींकडे लक्ष वेधले 
---------------------------

 


--------------------------

बीड (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांची आज बीड येथे आवर्जून विशेष भेट घेत आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली आणि हे प्रश्न आग्रहाने सोडविण्यासाठी विनंती करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांची बीड येथे माजी आमदार भीमराव  धोंडे यांनी भेट घेऊन आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीने नदीवरचे वाहून गेलेले पूल, बंधारे व शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीचे शासकीय नियमाप्रमाणे मिळणारे अर्थसहाय्य तातडीने देण्यात यावे असा आग्रह धरला. एमआरईजीएस अंतर्गत होणारे विहीर,रस्ते,शेततलाव आदि बंद असलेले कामे तात्काळ सुरू करावेत,असे जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात यावेत अशीही मागणीह लेखी निवेदनाद्वारे केली आहे.एकूणच आष्टी,पाटोदा,शिरूर  विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत महत्त्वाच्या समस्या आणि प्रश्नांवर विशेष भर देत हे प्रश्न मार्गी लागावेत या अनुषंगाने अजित दादाकडे माजी आ.भीमराव धोंडे यांनी विस्तृत चर्चा केली.तेव्हा  उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी यासंदर्भात स्वतः लक्ष घालून ते सोडवण्यासाठी कार्यवाही करू असा सकारात्मक प्रतिसाद दिला.



विविध प्रश्न मार्गी लागणार 

-----------------


आष्टी,पाटोदा, शिरूर, विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीने नदीवरचे वाहून गेलेले पूल बंधारे शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनी यांना शासकीय नियमानुसार मिळणारे अर्थसहाय्य तसेच एम आर ई जी एस अंतर्गत विहीर रस्त्याचे तलाव यासंदर्भात माजी आ. भीमराव धोंडे यांनी केलेल्या चर्चेनुसार  उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,पांडुरंग नागरगोजे,उत्तम बोडखे, भागवत वारे,अनिल जायभाये 

------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.