शेख मिनाज सिकंदर यांना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 शेख मिनाज सिकंदर यांना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान



कडा (प्रतिनिधी ) जि .प. प्रा.शा आष्टी नं. २ शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती शेख मिनाज यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेत गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला मॅडम मुळच्या आष्टी जि.बीड येथील असून यापुर्वी त्यांनी प्रा. शा. पांढरी येथे सात वर्ष सेवा केली व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र - १  अभियानांतर्गत सहभाग घेवून स्वच्छता मॉनिटर या घटकां वर विद्यार्थ्यांचे स्वच्छतेवर विडिओ व फोटो शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करून ६०% गुण मिळवून उत्कृष्ट कार्य करत पांढरीच्या शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांकचा मान मिळवून देत तीन लाखाचे बक्षीस प्राप्त करून दिले होते . शिवाय शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न केले. विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना समाविष्ट करून तालूका स्तर, जिल्हा स्तरावर प्रथम,द्वितीय क्रमांक मिळवून दिले. स्पर्धा परिक्षा जसे मंथन ' नवोदय स्कॉलरशीप परिक्षेचे जादा तासिका घेवून शिष्यवृत्ती मध्ये त्यांनी दोन विद्यार्थी पात्र केले अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांशी समरूप होण्याच्या प्रवत्तीमुळे व शैक्षणिक कामामुळे शाळेसह तालुक्यात त्यांचे कार्य सर्वदूर पोहचले त्यांच्या या कार्याची दखल घेत शेतकरी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वितरित होणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड केली व दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी आष्टी येथे मा.आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला . याप्रसंगी त्यांचे आई वडील,पती - अफजल सर ,मुलगा आमीर शेख,सुन फिजा मॅडम, समीर शेख फैज भैय्या, 'बॉईज शाळेचे मुख्याधापक सातपुते सर, पोले सर,नवगिरे सर,मोटे सर, अझहर शेख सर, इनामदार मॅडम,उत्तम पवार सर, खंडागळे सर,जाकीर शेख, सह आदी मान्यवर उपस्थित होते. 

     पुरस्कार मिळालेल्या बद्दल नारायण तरटे सर, संजय कोकाटे सर,अशोक पवार ,आयुब पठाण सर , चंद्रकांत शिंदे सर,अफसाना मॅडम,पवार मॅडम,सुनिता झांजे मॅडम,शेंदुरकर मॅडम,काळे मॅडम तसेच केंद्र आष्टी नं. १ च्या सर्व शिक्षक शिक्षिकांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.