श्रीराम कथेमुळे मानवी जीवनातील आदर्श जीवनमूल्य नीतिमत्ता आणि संस्कृतीचे दर्शन घडते. - महंत मंदार महाराज रामदासी

 श्रीराम कथेमुळे मानवी जीवनातील आदर्श जीवनमूल्य नीतिमत्ता आणि संस्कृतीचे दर्शन घडते..-- महंत मंदार महाराज रामदासी 






********************

श्रीराम कथा सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी आष्टी शहरात शोभा यात्रेवर फुलांचा वर्षाव.. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

*********************


आष्टी (प्रतिनिधी) 


श्रीराम कथेचे महत्त्व हे मानवी जीवनातील आदर्श जीवनमूल्ये नीतिमत्ता आणि संस्कृतीचे मार्गदर्शन आहे राम कथेद्वारे आपल्याला कर्तव्य,त्याग सत्य आणि धर्माचे पालन कसे करावे याची शिकवण मिळते असे प्रतिपादन दादेगाव येथील देवदास स्वामी मठाचे  महंत मंदार महाराज रामदासी यांनी केले आष्टी येथे आमदार सुरेश धस यांचे वतीने आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार सुरेश धस आणि तालुक्यातील संत प्रवचनकार कीर्तनकार उपस्थित होते ते पुढे म्हणाले की, राम कथाही वैवाहिक जीवनातील आदर्श संबंधांपासून ते समाजातील समस्यांवर मात करण्याची प्रेरणा देते त्यातून मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तसेच रामकथा ही सत्य धर्म आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याचे मात्र शिकवते कसोटीच्या प्रसंगी ही जीवनमूल्य कशी जपायची हे त्यातून कळते राम कथा ही भारतीय संस्कृतीचा आणि साहित्याचा अविभाज्य भाग आहे श्रीराम हे विष्णूचे अवतार असल्याने राम कथा श्रवणामुळे ईश्वरी कृपेचा अनुभव येतो जीवनाचे सार संस्कृत जपाया आणि आदर्श मार्गदर्शक तत्व देणारे पवित्र महाकाव्य आहे राम कथेचे श्रवण केल्याने जीवनातील नकारात्मकता तणाव आणि भीती दूर होते तसेच मानसिक शांतता मिळते त्यामुळे श्रीराम कथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे त्यांनी शेवटी प्रतिपादन केले.

   या श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये उपस्थित प्रवचनकार,कीर्तनकार या संतांचे पूजन करण्यात आले विशेष म्हणजे पहिल्या दिवशी या संत पूजनाचा मान आष्टी तालुक्यातील पत्रकारांना देण्यात आला त्यांचे वतीने ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे,ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज,ह.भ.प.दिनकर तांदळे महाराज,

ह.भ.प.रामदास डोरले नाना,ह.भ.प.नवनाथ महाराज पोकळे,ह.भ.प.हौसराव महाराज आजबे,ह.भ.प. कारंडे महाराज,ह.भ.प. बाळासाहेब महाराज झगडे,ह.भ.प. रवी महाराज तवले, ह.भ.प.नानासाहेब महाराज भोगाडे,ह.भ.प. शेंबडे महाराज पांढरी,ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे,ह.भ.प.गोविंद महाराज पवार,ह.भ.प. महेश महाराज बळे,

ह.भ.प.जाधव महाराज दादेगावकर 

ह.भ.प. धस महाराज जामगावकर या संतांचे पूजन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, पत्रकार दत्ताभाऊ काकडे, पत्रकार प्रवीण पोकळे, पत्रकार गणेश दळवी, पत्रकार सचिन रानडे, पत्रकार राजेंद्र लाड आदी उपस्थित होते

     पंचायत समिती कार्यालयासमोर, आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त आज भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या पावन सोहळ्याचे आयोजन संत चरण सेवक आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

छत्रपती कॉम्प्लेक्स येथून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनि चौक, कमानवेस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पोलीस स्टेशन होत पंचायत समिती कार्यालयासमोर दाखल झाली. शोभायात्रेत भगवे ध्वज, टाळ-मृदुंगाच्या गजरात श्रीराम नामस्मरण, भजन-कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

प्रांगणात आल्यानंतर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गोमातेचे पूजन, ग्रंथ पूजन तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर प.पू. महंत मंदार महाराज रामदासी यांनी श्रीराम कथेला मंगल प्रारंभ केला.

भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यांतर्गत प.पू. महंत मंदार महाराज रामदासी यांच्या मधुर वाणीतील कथा निरूपण रविवार, दि. ११ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२.३० ते ४.०० या वेळेत पंचायत समिती कार्यालयासमोर, आष्टी येथे होणार आहे.

या पावन श्रीराम कथा सोहळ्याचा सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.यावेळी कोमल थेटे यांनी रामलल्लाची प्रतिकृती असलेली आकर्षण रांगोळी साकारून सर्वाचे लक्ष वेधले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.