तुकाराम बारामते यांना गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
कडा (प्रतिनिधी) भैरवनाथ विद्यालय सालेवडगाव येथील सहशिक्षक तुकाराम बारामते यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेत गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.शिक्षण क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. मूळचे धामणवन ता.अकोले जि.अहिल्यानगर येथील शिक्षक तुकाराम बारामते हे अतिशय प्रतिकूल परिस्थितल्या कुटुंबातील सदस्य असून शिक्षणामुळे आपण सर्व अडचणीवर व संकटावर मात करू शकतो हे मनाशी ठरवून इंग्रजी विषयात पदवी मिळवली व बीएड केले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना लोकमान्य शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयात नोकरी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी इंग्रजी विषयाचे अत्यंत उत्कृष्ट अध्यापन करत अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली.त्यांचे इंग्रजी विषयावरील प्रभुत्व व विद्यार्थ्यांशी समरूप होण्याच्या प्रवृत्ती मुळे अत्यंत कमी कालावधीत त्यांचे शैक्षणिक काम परिसरात, संस्थेत तसेच तालुक्यात सर्वदूर पोहोचले. त्यांच्या या कार्याची दखल घेत शेतकरी शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त वितरित होणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड केली व दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी आष्टी येथे त्यांना माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात आला. यावेळी मुलगी प्रणिती तुकाराम बारामते पत्नी सुवर्णा तुकाराम बारामते सह आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव एडवोकेट हनुमंत रावजी थोरवे साहेब, युवा नेते धैर्यशील थोरवे साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू गाडे सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सालेवडगावचे सरपंच महेश कराळे, उपसरपंच सिदु हजारे, माजी सरपंच महादेव डोके तसेच समस्त ग्रामस्थ सालेवडगाव यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.


stay connected