मोतीलाल कोठारी विद्यालयाची शैक्षणीक सहल उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला सहलीचा मनसोक्त आनंद

 मोतीलाल कोठारी विद्यालयाची शैक्षणीक सहल उत्साहात संपन्न 
विद्यार्थ्यांनी  समुद्रकिनारी लुटला सहलीचा मनसोक्त आनंद




आष्टी प्रतिनिधी -  दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते, त्याचवेळी शालेय विद्यार्थ्यांना वेड लागते ते शैक्षणिक सहलीचे. शालेय शिक्षण विभागाच्या नियमाचे पालन करून श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मोतीलाल कोठारी विद्यालय कडा या विद्यालयाने यावर्षी कोकण व समुद्रकिनारी सहलीचे आयोजन केले होते. 

या सहलीत विद्यालयाच्या ३४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राज्य महामंडळाच्या ९ बसेस व सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून  रांजणगावचा महागणपती, कार्ला लेणी - एकवीरा देवी, लोणावळा- मॅप्रो गार्डन, स्वामी नारायण मंदीर, वॅक्स मुझियम,  महडचा वरद विनायक गणपती, पालीचा बल्लाळेश्वर गणपती,उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड, अलिबाग बीच, मुरुड जंजिरा, दिवे आगार समुद्र किनारा, श्रीवर्धन समुद्र किनारा अणि हरिहरेश्वर समुद्र किनारा इत्यादी ठिकाणांना भेट देऊन सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. 

लोणावळ्यातील प्रसिद्ध सुनील यांच्या अंतराष्ट्रीय दर्जाच्या वैक्स ( मेणाच्या) जगातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा यांच्या पुतळ्याचे निरीक्षण करत आनंद घेतला.  अरबी समुद्रात असलेल्या जंजिरा किल्ल्यात जाऊन त्याकाळात किल्ल्यांच्या वास्तु रचनेचा अभ्यास केला. 

सहलीचे खास आकर्षण म्हणजे अलिबाग बीच, जंजिरा किल्ला, दिवे आगार बीच होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून माहिती घेऊन इतिहास-भूगोलाच्या पुस्तकात वर्णिलेली गोष्टी आपल्या डोळ्यांनी अनुभवल्या.संस्थेचे अध्यक्ष, प्रधानमंत्री, शालेयशिक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मथाजी शिकारे, पर्यवेक्षक सुहास गोले, सहल प्रमुख  मनोज सातपुते यांनी सहलीचे नियोजन केले. या सहलीत 

सुरेश दळवी, सुरेश  बेद्रे, रामनाथ धस, कृष्णा जाधव, बाळासाहेब चव्हाण, बबन शिरावळे, अशोक म्हस्के, रविंद्र म्हस्के, पोपट वायभासे, पुष्पा जरे ,जयश्री भोस, सविता कर्डिले , शिल्पा मुटकुळे, तनुजा मुंडे, डॉ तनवीर बेगम काझी, अनिल पोखरणा, भीमाशंकर मराठे, संजय नाथ, संदीप चव्हाण,  हरिदास मुटकुळे, कुलदीप राऊत, परसराम हंबर्डे, बाजीराव पाचे, गांधीसर, अशोक शिंदे इत्यादी शिक्षकांच्या उत्कृष्ट नियोजनातून विद्यार्थ्यांचा पर्यटन स्थळ भेटीचा आनंद द्विगुणित ठरला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.