माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते गांधी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय परीषदेचे उद्घाटन

 *माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते गांधी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय परीषदेचे उद्घाटन*



कडा: येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालयातील भाषा व सामाजिकशास्त्रे विभाग यांच्या वतीने दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी शाश्वत भविष्यासाठी भारताच्या ज्वलंत समस्यांचे निराकरण करणारी समकालीन आव्हाने या विषयावर एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे उद्घाटन  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व लखनौ विद्यापीठ लखनौ चे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष श्री कांतीलाल चानोदिया, संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री गोकुळदास मेहेर संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनिल झाडमुथा, श्री बिपिन भंडारी संस्थेचे सचिव श्री हेमंत पोखरणा, संस्थेचे मंत्री डॉ महेंद्र पटवा, श्री. विनोद बलदोटा, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी व संस्थेचे सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच या परिषदेसाठी तज्ञ प्राध्यापक, संशोधक, मार्गदर्शक, विद्यार्थी यांनी देशभरातून मोठ्या संख्येने नोंदणी केली असून ते उपस्थित राहून आपले संशोधन निबंध वाचन करणार आहेत. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त संशोधक, मार्गदर्शक यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.