लोहा येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण संवाद बैठक

 *लोहा येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण संवाद बैठक*










लोहा, चंद्रकांत वाघमारे


आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण संवाद बैठक शासकीय विश्रामगृह लोहा येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान दक्षिण नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी भूषविले.


बैठकीमध्ये लोहा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगचे आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समन्वयक उपस्थित होते. बैठकीमध्ये लोहा तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांबद्दल चर्चा करण्यात आली.


बैठकीमध्ये बोलताना लोहा तालुक्याचे जेष्ठ नेते 

महाराष्ट्र शासनाचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त बी.बी.गायसमुद्रे , व्ही.के. कांबळे गुरुजी, वाय.बी. महाबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल दादा गायकवाड यांनी तालुका अध्यक्ष पद कोणाला मिळो पण तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तेथे शाखा स्थापन झाली पाहिजे व स्थानिक पातळीवर तात्काळ सभासद नोंदणी करावी व वंचित बहुजन आघाडीची निवडणूक पूर्व कार्यकरणी आखणी करण्यात यावी अशी सुचक टिप्पणी केली.


गौतम वाघमारे माळेगावकर यांनी सांगितले की राजगृहाशी एख निष्टपणे काम करत आहे, करत आलो करत राहिल पण प्रस्थापितांच्या दावनिला आसलेल्या व सतत वंचित बहुजन आघाडीचे नाव घेऊन स्वतःला मीरवनारा व निवडणूक काळात कर्तव्य शुन्य असनारे ना संधी देऊ नये, पुढिल काळात तालुक्यात जास्तीत जास्त गावा गावात सभासद नोंदणी करावी ,गट -तट सोडुन एकत्र यावे अशी लक्षणीय  भूमिका मांडली.



बैठकीस उपस्थित जिल्हा महासचिव मा.रवि पंडीत,जिल्हा सचिव मा.रंगनाथ गजले,कायदा सल्लागार ॲड.जयपाल ढवळे प्रसिध्दी प्रमुख नामदेव पांचाळ, सुरेश गजभारे ,प्रा.ढवळे सर, भारतीय बौद्ध महासभा, धोंडीबा यानभुरे,सावळे मॅडम, विजय कुमार जोंधळे व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.