आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व गृहराज्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन

 आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व गृहराज्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन 



आष्टी। प्रतिनिधी 

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत या संघाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे इतर पत्रकार संघानी दखल घेऊन समाजासाठी काम करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब व गृहराज्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री डॉ पंकज भोयर साहेब यांनी केले.यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे मुंबई येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात व मंत्रालयात सोमवार दि २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी प्रकाशन करण्यात आले.

आष्टी तालुका युवा पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असून तसेच गेल्या १३ वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित करून सर्वसामान्यांना व इतर सर्व क्षेत्रातील नागरिकांना मोफत वितरण करण्यात येत आहे.सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे मुंबई येथील महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांच्या मुंबई येथील त्यांच्या मनोरा संपर्क कार्यालयात त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच गृहराज्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री डॉ पंकज भोयर साहेब यांच्या मंत्रालयातील त्यांच्या दालनात त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर या दोन्ही हि मान्यवरांनी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव गहिनीनाथ पाचबैल, पत्रकार प्रेम पवळ, मारूती सत्रे, सोपान पगारे,बाळु राऊत, महेश गोरे आदी उपस्थित होते.




 

आजपर्यंत युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे या मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन...


आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे मागिल १३ वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक धार्मिक ‌क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे,अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ,पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे, मंत्री अतुलजी सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकनकर,माजी मंत्री आ.सुरेश धस, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री सदाभाऊ खोत,स्व शिवाजीराव कर्डिले,आ रोहित पवार, माजी.आ.बाळासाहेब आजबे,स्व आ.अरुण काका जगताप, माजी.आ.भिमराव धोंडे, गहिनीनाथ गडाचे महंत हभप विठ्ठल महाराज, पनवेलचे आर आर फाऊंडेशनचे अध्यक्ष स्व.राहुल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.