सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन संमेलनाध्यक्ष अमर हबीब यांच्यासह मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले यांची उपस्थिती

 सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन    
 संमेलनाध्यक्ष अमर हबीब यांच्यासह मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले यांची उपस्थिती 






              

शिरूर:-   

      सिंदफणा बहुउद्देशीय संस्था, मराठी भाषा विभाग, एकलव्य विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातवे जिल्हास्तरीय सिंदफणा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या थाटात भास्कर चंदनशिव साहित्यनगरी, शिरूर येथील एकलव्य विद्यालयात मध्ये संपन्न झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष अमर हबीब यांच्यासह उद्घाटक म्हणून मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, पद्मश्री शब्बीर सय्यद, सिद्धेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी विवेक शास्त्री महाराज, युवा नेते जयदत्त धस, मसापचे सदस्य दगडू लोमटे, सुशीला मोराळे, दादा गोरे, नवनाथ सानप, भास्कर बडे यांची उपस्थिती होती. सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. या वेळी ग्रंथदिंडी मध्ये महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. जिजामाता चौकापासून निघालेल्या ग्रंथदिंडीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडी भास्कर चंदनशिव साहित्यनगरी, एकलव्य विद्यालयात आल्यानंतर एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले. संमेलनाचे अकरा वाजता उद्घाटन संपन्न झाले. बोलीभाषा टिकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील असे म्हणाले. तर चार खांब उद्ध्वस्ततेनंतर पाचवा खांब लेखकांनी व्हावे असे अमर हबीब म्हणाले. मान्यवरांचा पुस्तक, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर बडे यांनी केले. सूत्रसंचालन अप्पासाहेब तांबे तर आभारप्रदर्शन गोकुळ पवार यांनी केले.



मराठी लेखकांनी परिवर्तनवादी लेखन करावे परिसंवादातील सूर 


शेतीचे प्रश्न, सरकारी धोरण आणि लेखकाची भूमिका या विषयावर परिसंवाद झाला. यात गणेश मोहिते शेतकऱ्यांचे प्रश्न साहित्यातून आलेले नाहीत अशी खंत व्यक्त केली. तर

लेखकांनी सामाजिक जीवनाचे भान राखावे, मराठी लेखकांनी परिवर्तनवादी लेखन करावे असे अध्यक्षीय भाषणात डॉ. दादा गोरे यांनी सांगितले. तर कालिदास आपेट यांनी शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. अप्पा तांबे, महारूद्र डोंगरे, निवृत्ती बेद्रे, डॉ. विठ्ठल जाधव, डॉ. सोपान सुरवसे यांचे उपस्थितीत सूत्रसंचालन डॉ. सुधीर येवले यांनी केले. तर नवनाथ पवळे यांनी आभार मानले. 


डॉ. कैलास दौंड यांची मुलाखत रंगली


     साहित्य लेखनाचे अनेक प्रश्नांचे कांगोरे उलगडत लक्ष्मण खेडकर यांनी घेतलेली मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. मुलांनी, श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. 


सिंदफणा मराठी साहित्य संमेलन 

दुपारच्या सत्रात कथाकथन कार्यक्रमात 

आरध्या गीते, अशोक नजन यांनी हळवा दिप्या, लक्ष्मण दिवटे यांनी उसवण, गोरख शेंद्रे यांनी संप्या कथा दमदारपणे सादर झाली. भास्कर बडे यांनी देवाची वाटणी ही कथा खास शैलीत सादर केली. तर अध्यक्षीय कथाकथनात प्रकाश भूते यांनी लगीन ही कथा सादर केली. सर्वच कथा ग्रामीण ढंगातील होत्या. जिजा खोले, दिलीप वारे, लक्ष्मण झिंजुर्के, प्रभाकर सानप, प्राचार्य निलेश पोकळे, कृष्णा ढाकणे, सतिश मुरकुटे, कृष्णा जाधव यांचेसह संमेलनास शिरूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.