सचिन तेंडुलकर यांना भेटण्यासाठी २२ वर्षापासुन जोपासला अनोखा छंद
कडा (प्रतिनिधी) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहते सुधीर रामनाथ दरेकर राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) यांनी एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे.
वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले सचिन तेंडुलकर यांचे छायाचित्रे, लेख ,माहिती इ.सन १९९९ पासून २०२२ पर्यंत जमा करून ठेवली आहे. हा संग्रह खूप मोठा आहे त्या सर्व फोटो कात्रण एकत्र चीटकुन त्याचे जवळपास २५ पुस्तके बनवले आहे. प्रत्येक पुस्तकात १०० पाने आहेत.सचिन तेंडुलकर यांना भेटून हा उपक्रम दाखवता यावे याठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील २२ वर्षापासून पेपर मधील सचिन तेंडुलकर यांचे कात्रण जमा केले ते कात्रण सचिन तेंडुलकर यांची भेट घेऊन हा संग्रह तेंडुलकर यांना दाखवण्याची सुधीर दरेकर यांची इच्छा आहे.



stay connected