धानोरा महाविद्यालयाचे प्रा निसार शेख महाराष्ट्र गौरव 'आदर्श शिक्षक' राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
सिने अभिनेत्री चित्रा दिक्षित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राठोड यांच्या हस्ते झाला सन्मान
आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रा निसार शेख यांना शनिवारी दैनिक लोकशक्तीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकशक्ती महाराष्ट्र गौरव 'आदर्श शिक्षक' हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित आले. सिने अभिनेत्री चित्रा दिक्षित, नागपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दत्ताराव राठोड, ‘गावरान मस्ती’ फेम वैभव कुऱ्हाडे (गंठणकुमार), ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, डॉ. कैलास दौंड, 'झुंजार नेता'चे उपसंपादक उत्तमराव बोडखे, संपादक विजय लेंडाळ, सहसंपादक इम्रान शेख, पत्रकार जावेद सय्यद व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा निसार शेख हे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे गेली २५ वर्षापासून प्राध्यापक म्हणून न्यायदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. शिक्षण क्षेत्रा बरोबरच ते पत्रकार म्हणून ही उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. शैक्षणीक व पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याने त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रा निसार शेख यांनी गेली २५ वर्षात हजारो विद्यार्थी घडविले आहे. आज त्यांचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी अहील्यानगर येथील हॉटेल यशग्रँड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकशक्ती महाराष्ट्र गौरव आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा निसार शेख यांचे माजी आमदार भिमरावजी धोंडे, प्रशासन अधिकारी शिवदास विधाते, डी बी राऊत, माऊली बोडखे, संदीप नन्नवरे, सागर वाघुले, प्राचार्य भगवान वाघुले, उपप्राचार्य गहिनीनाथ एकशिंगे, पत्रकार अविनाश कदम, अक्षय विधाते, मुख्याध्यापक तथा पत्रकार जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते समीर शेख, संतोष नागरगोजे, गनिभाई तांबोळी, निसारभाई कुरेशी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


stay connected