कड्यात रस्त्यावरील चेंबर दुरूस्तीची मागणी
चेंबरपासुन २० फुटावर अंगणवाडी ; वर्दळीचा रस्ता
कडा (प्रतिनिधी) कडा ता. आष्टी येथील बाराभाईगल्लीतून तेलीगल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यातच असलेल्या चेंबरचे झाकण तुटून गेले ह्याला जवळपास दोन महिने झाले. येथील महिलांनी संबंधिताकडे तोंडी तक्रार केली होती परंतु अद्याप कोणी कसलची दखल घेतली नाही असे येथील महिलांनी सांगितले. येथील महिलांनी कडा येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद यांना याबाबत माहिती दिली व चेंबर दुरूस्तीची मागणी ग्रामपंचायती कडे करण्याची विनंती केली असता त्याच ठिकाणांहून महिलांसमोर रहेमान सय्यद यांनी तुटलेल्या चेंबरचे फोटो काढून कडा येथील ग्रामसेवक यांना दिनांक ११ नोव्हेंबर रोजी व्हाट्सअप वर पाठवले व भ्रमणध्वनी वरून संपर्क करून याबाबत सविस्तर माहिती दिली व विनंती केली की येथील महिलांनी सांगितले आतापर्यंत या चेंबर मध्ये चार -पाच जण पडले होते. आणि दोन वेळेस वाहनांचे चाके त्या चेंबर मध्ये गेली होती. आणि या चेंबर पासून २० फुटांच्या अंतरावरच अंगणवाडी आहे म्हणून या चेंबरची दुरुस्ती लवकर करण्याची विनंती केली होती. परंतु आज दिनांक २० नोव्हेंबर पर्यंत ग्रामसेवक यांनी दखल घेतली नाही. हा चेंबर रस्त्यावरच असल्याने ये-जा करतांना अजूनही कोणी पडून अपघात होऊ नये, चेंबर मधून येणारा घाण वास बंद व्हावा यासाठी या चेंबरची लवकरात लवकर दुरूस्ती करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे. आज पत्रकार रहेमान सय्यद यांनी ग्रामसेवक यांना भ्रमणध्वनीवरून या चेंबर बाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि आता कर्मचारी पाठवतो व काम लवकरच करून घेतो. आता या चेंबर दुरूस्तीचे काम कधी चालू होईल आणि चेंबरची कधी दुरूस्ती होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


stay connected