*ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्या पाटेकर यांच्या शुभहस्ते कथालेखक बाळासाहेब देशमुख.. साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित*
अहिल्यानगर:- लोकशक्ती न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ,राज्यस्तरीय लोकशक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण अहिल्यानगर येथील यश ग्रँड हॉटेलमध्ये वितरित करण्यात आले.सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर होते. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर कैलास दौंड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अहिल्यानगर येथील कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना साहित्यिक लेखनाबद्दल ,लोकशक्ती साहित्यरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांच्या शुभहस्ते बहाल करण्यात आला.
या कार्यक्रमात गावरान मस्ती फेम वैभव कुराडे ,सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित, डॉक्टर दत्ताराम राठोड, संतोष मुटकुळे ,प्रल्हाद गीते, कृष्णा मसुरे, मुख्य संपादक विजय लेंडाळ, इमरान शेख या मान्यवरांसह,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब देशमुख हे साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असून, प्रासंगिका ,वात्रटिका, ललित लेख, कथा असे त्यांचे अनेक प्रकारचे साहित्य लेखन विविध वृत्तपत्र, दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध होत असतात. नगरी झटका, नगरी मसाला, नगरी तडका हे प्रसंगीका सदर तर रंग माझा वेगळा ,बदललेला गाव, हरवलेली माणसे, प्रसन्नतेचा गाव, लेखन कट्टा असे विविध सदर त्यांनी आजवर लिहिलेले आहेत. गाजलेले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य एस बी शेख, आणि ज्येष्ठ साहित्यिक, कविवर्य श्री बाळासाहेब कोठुळे यांनी केले.


stay connected