ट्रे हिशोब क्लोजींग न झाल्याने वाहक राठोड धोंडीराम काशिनाथ यांनी केली तक्रार

 ट्रे हिशोब क्लोजींग न झाल्याने वाहक राठोड धोंडीराम काशिनाथ यांनी केली तक्रार


आष्टी आगारात कार्यरत असलेले वाहक धोंडीराम राठोड यांनी आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि. २८/०८/२०२५ रोजी मेहकरी मुक्कामी ड्युटी करीत असतांना अचानक ईबेक्स मशिन बंद पडली व ३५६ रुपयाचे ट्रे तिकीट वापरले परंतू ट्रे क्लोसिंग करताना.रु. ३५६ कॅशिअर बरके यांचेकडे जमा परंतू तिकीट ट्रे मधुन कमी झालेले ऑनलाईनला दिसत नसल्याने मी बरके यांना रु. ३५६ चा भरणा केलेला आहे.


तरी वारंवार या बाबत तक्रारी मी वाहतूक नियंत्रक, कॅशीयर व आगार प्रमुख यांना दिलेली आहे या घटनेला २ महिने उलटून देखील अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.


भविष्यात मी ड्युटीवर गेल्यानंतर भरारी पथक यांनी माझे तिकीट ट्रे ची व गाडी तपासणी केल्यास मी दोषी आढळ्यास रु. ३५६ ची तफावत जाणवल्यास त्यास मी जबाबदार राहणार नाही माझ्या ऐवजी संबंधीत कॅशियर वरपे, वा.नि. गुगळे, बरके, वा.अ. काळे हे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.


तरी मे. साहेबांनी तिकीट ट्रे क्लोजिंग होई पर्यंत मला कंट्रोल पॉईंट देण्यात यावा किंवा कडा ग्रुप मध्ये ऑर्डीनरी ड्युटी देण्यात याव्यात कारण मी सेवा ज्येष्ठते नुसार कडा ग्रुप मध्ये बसत आहे व माझ्या नंतरचे वाहक या ग्रुपमध्ये काम करीत आहेत.

तरी मी मा. वाहतूक निरीक्षक गुगळे व काळे यांना मला कडा ग्रुप मध्ये टाकण्याची विनंती केलेली आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे राठोड धोंडीराम काशिनाथ (वा.क्र. २४०२५ ) यांनी केली आहे

या निवेदनाच्या प्रति मा. विभागीय वाहतूक अधिकारी बीड , मा. विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी बीड , मा. विभागीय कामगार अधिकारी, बीड. यांना माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सादर केले आहेत



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.