शिरूरकरांनी साहित्य चळवळ जोपासली - प्राचार्य दीपाताई क्षीरसागर
--
सिंदफणा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
---
शिरूर कासार
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलन२०२५ च्या बोधचिन्हाचे अनावरण प्राचार्य दीपाताई क्षीरसागर यांचे हस्ते दि. २४ रोजी करण्यात आले.
शिरूर कासार तालुक्यात साहित्य चळवळ सातत्यपूर्ण सुरू आहे. साहित्यिक चळवळ उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा प्राचार्य दीपाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केली. दि. १६ आणि १७ डिसेंबर रोजी शिरूर कासार येथे होणारे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन आगळे वेगळे ठरणार आहे. त्या अनुषंगिक बोधचिन्हाचे अनावरण सहाव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंदफणा नदी ही बीड जिल्ह्यातील जीवनवाहिनी आहे. सिंदफणा नदीच्या काठावर वसलेले भाषिक, सांस्कृतिक जनजीवन साहित्याच्या माध्यमातून चित्रीत करण्याचा संदेश बोधचिन्हातून देण्यात आला आहे. याप्रसंगी आजिनाथ गवळी, मसाप शिरूरचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक घोळवे, साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव, सतिश मुरकुटे, जमीर शेख आदी उपस्थित होते.


stay connected