संस्कृती विद्यामंदिर आष्टी येथे बाल आनंद नगरी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न

 संस्कृती विद्यामंदिर आष्टी येथे बाल आनंद नगरी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न









आष्टी प्रतिनिधी 


आष्टी शहरातील संस्कृती विद्यामंदिर या शाळेत बाल दिनानिमित्त बाल आनंद नगरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       यावेळी उपस्थित पालकवर्ग आणि शिक्षकवृंद यांनी भाजीपाला खरेदीचा व विद्यार्थ्यांनी बनविलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले व या उपक्रमाबाबत पालकांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.बाल आनंद नगरीत परिसरातील भाजीपाला - फळे, पाककृती, व्यवसाय ओळख, व्यवहार ज्ञान, मूलभूत क्रिया, नवनिर्मिती, मनोरंजन आदी आनंददायी शिक्षणाची वैशिष्ट्ये अनुभवायला मिळाली. यात भाजीपाला व फळे स्टॉल, इडली,भेळ,गुलाब जामून,ढोकळा,पाणी पूरी,समोसे,शिरा,आदी खाद्यपदार्थ स्टॉल मांडण्यात आले होते. सदर आनंद नगरीला पालकांनी भेट देत खरेदी केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली. या आनंद नगरीत हजारो रूपयांची उलाढाल झाली. 

         हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संचालक अशोक तांबे सर, सौ. शीतल तांबे मॅडम,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.