युवा नेते शिवसेनेचे नांदेड दक्षिण ता.प्रमुखअशोक भाऊ मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

 युवा नेते शिवसेनेचे नांदेड दक्षिण  ता.प्रमुख अशोक भाऊ मोरे यांचा  अभिष्टचिंतन सोहळा संपन्न 



सोनखेड :- चंद्रकांत वाघमारे 


लोहा तालुक्यातील सोनखेड येथील प्रत्येकाच्या समस्येला धाऊन येणारा युवा नेते भावी जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने  रुग्णांना मोफत दंत तपासणी नेत्र तपासणी करून चेषश्मे  वाटून साजरा करण्यात आला. सोनखेड परीसरात लहान वयापासून मित्राच्या गराड्यात वावरणारे सर्वाचे जिगरी मित्र, लोकहिताच्या कामामुळे जनतेचे युवा नेते बनलेत.आशोक भाऊ  यांनी वेगळेपण जपत एक वलयं तयार केल्याचे दिसून येत आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजहिताची कामे करण्यात ते सदैव अग्रेसर असतात. कोणाच्याही सुख दुःखात धावून जाण्याची ख्याती. सामान्यतल्या सामान्य लोकासाठी आपला हक्काचा माणूस म्हणून अशोक भाऊ यांच्याकडे बघितले जाते. 

सोनखेड परीसरातिल भविष्यातील नेते भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा युवा नेत्याचा  वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.  वाढदिवसानिमित्त सामाजहिताची कामातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्र परिवरातून नेहमी केला जातो.


 शिवसेना दक्षीण तालुका अध्यक्ष  यांच्या वाढदिवसा निमित्य  विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. सोनखेड येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी शाल पुष्पहार, गुच्छ पेढे भरवून अभिष्टचिंतन केले. यावेळी

माऊली नाना, सुदामराव मोरे,शाम बोकारे, संतोष जाधव,समी कुलकर्णी, शिवशंकर टेकाळे, आनंदराव दुंडे 

यांच्या सहित अनेक मान्यवरांनी मित्रमंडळींनी शुभेच्छाचा वर्षाव केला.

युवा नेते भावी जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी व नेत्र तपासणी करून मोफत चश्मे  वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.