योगासने स्पर्धेत श्रीम. किरण घाडगे तालुक्यात प्रथम

 *योगासने स्पर्धेत श्रीम. किरण घाडगे तालुक्यात प्रथम*



 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यामध्ये योगासने या स्पर्धा प्रकारामध्ये ( २५ ते ४५) या वयोगटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली येथील शिक्षिका श्रीमती किरण घाडगे यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला . या स्पर्धेमध्ये माळशिरस तालुक्यातील शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून श्री प्रवीण टाकसाळ सर यांनी काम पाहिले. त्यांची पुणे येथे होणाऱ्या *विभागीय स्पर्धेसाठी* माळशिरस तालुक्यातून निवड झाली आहे. आतापर्यंत त्यांनी विविध स्पर्धा प्रकारामध्ये यश मिळवले आहे. नुकत्याच त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात आलेल्या *सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण* झाल्या आहेत तसेच अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठातून त्यांची *पीएच.डी* चालू आहे.त्यांच्या या यशाबद्दल  गटशिक्षणाधिकारी सौ. सुषमा महामुनी मॅडम, केंद्रप्रमुख. श्री बापूसाहेब नाईकनवरे, बीआरसी माळशिरस ची सर्व टीम, तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू- भगिनी, वेळापूर मुलींच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.