*!!अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा 'राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार'..बाळासाहेब देशमुख यांच्या 'रंग माझा वेगळा'..या कथासंग्रहास..!!*
अहिल्यानगर:- अहिल्यानगर येथील कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांच्या पहिला कथासंग्रह 'रंग माझा वेगळा' या पुस्तकाची, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा 'महात्मा फुले साहित्यरत्न पुरस्कारासाठी' निवड करण्यात आलेली आहे.
असे पत्र नुकतेच श्री बाळासाहेब देशमुख, कथा लेखक यांना, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ.शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
परिषदच्या १९ व्या अखिल भारतीय महात्मा फुले, प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे संपन्न होत आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, कवी माननीय किशोर टिळेकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
संमेलन प्रसंगी 23 नोव्हेंबर 2025 रोजी संमेलन अध्यक्ष माननीय किशोर टिळेकर यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
'रंग माझा वेगळा' हा कथासंग्रह, 'सकाळ प्रकाशन' ने केलेला आहे.
श्री बाळासाहेब देशमुख यांच्या कथा, येथील वृत्तपत्रात ,दर शनिवारी 'लेखन कट्टा' या सदर मध्ये येत असतात.
संमेलन पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ. शरद गोरे (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद), डॉक्टर संजय चोरडिया (उद्घाटक), दत्तात्रय भोंगळे (स्वागता अध्यक्ष) सुनील लोणकर(निमंत्रक), त्याचप्रमाणे सुवर्णा पवार, शुभांगी काळभोर, फुलचंद नागटिळक , डॉक्टर हनुमंत चिकणे, सूर्यकांत नामूगडे ,संतोष शेलार ,असे मान्यवर, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


stay connected