*ट्रम्पच्या धर्मसत्ता आणि* *अर्थसत्तेच्या अभद्र युतीला झटका*.
📚✍️ *युन्नूस तांबोळी,अकलूज*.
*स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मानव मुक्तीच्या सूत्रावर काळे निब्बर ढग दाटलेले असताना दाटून* *आलेल्या अंधारात अंधाराला चिरत आलेला प्रकाश म्हणजे झोहरान ममदानीचा विजय आहे*.
*अमेरिकेच्या आर्थिक आणि सामाजिक सौहार्द श्रीमंतीचे प्रतीक असलेल्या न्यू यार्क शहराचे महापौर पद मानाचे सन्मानाचे 400 वर्षात अनेक*
*मान्यवरांनी भूषवले.अवघ्या 34 वर्षाचे तरुण झोहरान ममदानी यांनी इतिहास घडविला.केवळ मुसलमान अशी ओळख ट्रम्प यांनी करून दिली होती*. *उजव्या विचारसरणीला कायम विरोध करणारा मुसलमान म्हणून निवडून देऊ नका, निवडून दिले तर शहराची निधी पुरवठा बंद करू ममदानी हे स्थलांतरित आहेत*. *अशा प्रकारे सगळीकडून नाकेबंदी केली होती*.
*मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या एककल्ली कारभारामुळे आणि उजव्या टोकाच्या राजकारणामुळे अमेरिकेची आर्थिक सामाजिक, राजकीय,आंतरराष्ट्रीय घडी पार विस्कटली आणि लोकशाही मूल्याचे खच्चीकरणझाले ट्रम्प यांनी एकाच वेळी अंतर्गत आणि बाह्य आघाडीवर शत्रू निर्माण केले. वंशभेदावर आधारीत धर्माधाची युती अमेरिकेत सत्तेचा सोपान चढत होती.अशातच ममदानी यांनी ट्रम्पला जोरात झटका दिला*.
*ममदानी हे डाव्या विचाराचे कडवे कम्युनिस्ट असून ते उजव्या विचारसरणीला घातक आहेत. यामुळे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता आणि उद्योजक या सर्वांनी मिळून ममदानीच्या पराभव करायचा विडा उचललेला होता. मात्र ट्रम्पची हुकूमशाही उजव्या विचारसरणीमुळे अमेरिकेचे होत असलेली वाताहत यामुळे अमेरिकन जनता त्रस्त होती, याचा फटका ट्रम्पला बसला, याचा परिणाम जागतिक राजकारणावर नक्कीच दिसणार आहे हे निश्चित*.


stay connected