आष्टी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न तालुकाध्यक्ष फारूखभाई यांनी केली नूतन कार्यकारीणी जाहीर

 आष्टी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न
तालुकाध्यक्ष फारूखभाई यांनी केली नूतन कार्यकारीणी जाहीर





आष्टी ( प्रतिनिधी)- आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद व जिल्हा परिषद पंचायत निवडणूकाच्या अनुषंगाने आष्टी तालुका  काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दि. 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद फारुखभाई यांच्या अध्यक्षतेखाली धानोरा येथे आयोजित करण्यात आली होती . यावेळी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारीणी ची निवड करण्यात आली . यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी या बैठकीस उपस्थिती दर्शवीली . यावेळी देविदास जीवाजी गुंड , शिंदे किशोर उत्तम , सुधीर कचरू भालेकर यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर पुढील प्रमाणे कार्यकारीणी च्या इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या . - दादा लाभाजी गवळी - सरचिटणीस , मोहम्मद सादिक माणिक सय्यद - सरचिटणीस ,अजित आबा गीऱ्हे -  सरचिटणीस , त्रिंबक किसनराव इथापे (आण्णा) - सचिव , शाम देविचंद पवार - सचिव , शाहनवाज दगडूभाई शेख - सचिव जावेद बाबुलाल सय्यद -  खजिनदार यांच्या निवडी जाहीर केल्या . यावेळी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दादा ,खासदार रजनीताई पाटील ,माजी मंत्री अशोकरावजी पाटील , महाराष्ट्राचे सरचिटणीस आदित्य पाटील ,काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या सूचनेवरून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या . यावेळी उपस्थिती महिला जिल्हा अध्यक्ष मीनाक्षीताई पांडुळे , महिला तालुका अध्यक्ष नौशाद शेख ,महिला तालुका उपाध्यक्ष राणी आमले , शेकापचे शिवाजी सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.