आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश ******************************* दौलावडगाव येथे 33/11 केव्ही उपकेंद्रासाठी 5 एसएमव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर

 आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश 
*******************************
दौलावडगाव येथे 33/11 केव्ही उपकेंद्रासाठी 5 एसएमव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर 

********************************



********************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. मतदारसंघाचे लोकनेते आ. सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुराव्याला यश मिळाले असून मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी 2.0 या योजनेअंतर्गत 33/11 के.व्ही. उपकेंद्र दौलावडगाव येथे 5  एसएमव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे.

      या मंजुरीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कमी व्होल्टेजच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून परिसरातील दौलावडगाव,सालेवडगाव,अंभोरा,पिंपळगाव घाट, आंबेवाडी, बांदखेल, केळ, हरेवाडी आणि मराठवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना उच्च दाबाने, सुरळीत व स्थिर वीजपुरवठा होणार आहे.गेल्या काही वर्षांपासून या भागात शेतीपंपांना योग्य दाबाने वीज न मिळाल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पाणी पाजण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आ. धस यांनी सातत्याने शासनस्तरावर, ऊर्जा विभाग व महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करत या समस्येवर उपाय करण्याची सततच्या मागणीला पाठपुराव्याला अखेर शासनाने या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरच्या मंजुरीला हिरवा कंदील दाखवला असून यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार आहे.

या निर्णयामुळे दौलवडगाव परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून झाले परिसरातील ग्रामस्थांनी आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नाने आमच्या शेतीला उजेड मिळाला आहे अशा शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.