आष्टी वकिल संघाच्या अध्यक्षपदी सय्यद ताहेर तर सचिवपदी उध्दव पोकळे यांची अविरोध निवड
-------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी वकील संघाची निवडणूक घेण्यासाठी दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक घेण्यात आली.या बैठीकीमध्ये निवडणूक जाहिर करण्याबाबत चर्चा सुरु असतांना जेष्ठ वकिलांनी निवडणूक अविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला.त्यास बैठीकिमध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी संमती दिली.त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या विधिज्ञांनी ॲड.सय्यद ताहेर यांची अध्यक्षपदी,उपाध्यक्षपदी बाप्पासाहेब खिल्लारे तर सचिवपदी उध्दव पोकळे, कोषाध्यक्षपदी जे.जी.खंडागळे, महिला प्रतिनिधी म्हणून सोनल केरूळकर यांची अविरोध निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदासाठी सय्यद ताहेर यांचे नावाची सुचना आदिनाथ पोकळे यांनी केली. कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तत्कालीन अध्यक्ष ए.एन.जेवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.आष्टी वकील संघाच्या निवडणूक बैठीकीसाठी वकील संघांचे जेष्ठ,कनिष्ठ सदस्य,जेष्ठ सदस्य,जगताप आबा, काशीनाथ फुंदे,बाबुराव अनारसे,आदिनाथ पोकळे, अविनाश निंबाळकर आदि सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------


stay connected