आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे निधन
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण मतदारसंघाला मोठा धक्का बसला आहे. आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर त्यांनी केलेले लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील.ते नाथभक्त होते आणि दरवर्षी न चुकता मच्छिंद्रनाथ गडावर दर्शनासाठी जात असत
राज्याचे माजी मंत्री, नगर–पाथर्डी-राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते भारतीय जनता पक्षाकडून दुसऱ्यांदा ते निवडून आमदार झाले होते .
बुऱ्हाननगर सारख्या ग्रामीण भागातून व्यापक जनसंपर्क वाढवत त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. व्यापक जनसंपर्क असलेला नेता नगर जिल्ह्यानं गमावला आहे.
आमदार कर्डिले यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता बुऱ्हाणनगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. .


stay connected