माधुरीताई खाकाळ यांना कडा गटातून उमेदवारी देण्याची युवा नेते अम्मुभाई उर्फ अजहरूद्दिन सय्यद यांनी केली मागणी
आष्टीः सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून नुकतीच तालुकास्तरावर यासाठी आरक्षण सोडत झाल्याने अनेक जण कामाला लागल्याचे दिसून येत आहे. सर्व सामान्य लोकांच्या सुखादुखात व मित्रांच्या मदतीला धावून जाणारे संदिप साहेब खाकाळ यांच्या पत्नी माधुरीताई यांना कडा गटातून उमेदवारी देण्याची मागणी युवा नेते अम्मुभाई उर्फ अजहरूद्दिन सय्यद यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक, खाकाळवाडी सह अनेक गावात सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन लोकांच्या अडीअडीचणी सोडवण्यासाठी कायम उभा असलेले आ. सुरेश आण्णा धस याचे विश्वासू व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले संदिप खाकाळ याच्या पत्नी माधुरीताई यांनी कड्यासह कडा गटात महिलांचे मोठे संघटन करून सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख तयार केली आहे.तसेच संदिप खाकाळ यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने आणि आता कडा गट हा सर्व साधारण महिलेसाठी असल्याने 'आण्णा' आमच्या ताईला उमेदवारी द्यावी. अशी मागणी करत तरूणाई आता कामाला लागली आहे . कडा गटाची उमेदवारी माधुरीताई संदिप खाकाळ यांना देण्याची मागणी अम्मुभाई यांनी केली आहे..



stay connected