बुद्धिबळ स्पर्धेत 'सृजन पेठकरचे' सुयश
----------------------
कडा / वार्ताहर
-----------------
अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या पीएम मुनोत कनिष्ठ महाविद्यालयाचा सृजन पेठकर या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कडा येथील पीएम मुनोत कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सृजन महेंद्र पेठकर याने शालेय शिक्षण क्रीडा विभाग, क्रीडा संचनालय व महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 8 ऑक्टोबर रोजी बीड येथे 19 वर्षाखालील जिल्हास्तरीय आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सृजन याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल अमोलक संस्थेचे योगेश भंडारी, हेमंत पोखरणा, कांतीलाल चानोदिया, गोकुळदास मेहर, बाबुलाल भंडारी, डॉ. उमेश गांधी, अनिल मुथा, बिपिन भंडारी, संचालकांसह प्राचार्य डॉ. जमो भंडारी, क्रीडा शिक्षक प्रा.जमीर सय्यद, प्रशासकीय अधिकारी नवनाथ पडोळे, प्राचार्य शिकारे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
------&&---------


stay connected