डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा..i न्याय मिळण्यासाठी मुंडे कुटुंबियांच्या पाठीशी.. आ.सुरेश धस

 डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा..i
न्याय मिळण्यासाठी मुंडे कुटुंबियांच्या पाठीशी..
आ.सुरेश धस 





आष्टी (प्रतिनिधी)


बीड जिल्ह्यातील कोठरबन येथील अल्पभूधारक शेतकरी असणाऱ्या मुंडे कुटुंबीयांनी कष्ट करून पोटाला चिमटे घेऊन मुलीला डॉक्टर केले त्या डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करावी लागली या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, संपदाच्या घरमालकाचा मुलगा बनकर, तिच्यावर दबाव आणणारे तथाकथित खासदार, त्यांचा पीए, आणि तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी या सर्वांची कसून चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे

 याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना..

 ते पुढे म्हणाले, बीड जिल्ह्यातील जनता गोरगरीब असले तरी कष्टकरी परंतु स्वाभिमानी आहे राज्यात शैक्षणिक 

 क्षेत्रात बीड जिल्ह्यातील मुला-मुलींनी नाव कमावले आहे मात्र डॉ.संपदा मुंडे हिला बीडची आहे असे म्हणून हिणवण्यात आले आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे डॉ.संपदा हिला आत्महत्यामे सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले यामागे काहीतरी गंभीर कारण असावे

 आमच्या भागातील गोरगरीब लेकींचा कोणी गैरफायदा घेत असेल त्यांना जरब बसण्याची आवश्यकता आहे.. यापुढे दुसरी संपदा होऊ नये यासाठी

  या आत्महत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारा करण्यात यावा आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा जेणेकरून आरोपींना तात्काळ शिक्षा मिळेल मयत डॉ.संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहणार आहे असेही आ.धस यांनी शेवटी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.