निष्ठा, प्रामाणिकपणा व कर्तुत्ववान सेवेमुळे* *जे. आर. पवार उत्कृष्ट प्रशासक ठरले* .. माजी मंत्री बाळासाहेब थोरात

 *निष्ठा, प्रामाणिकपणा व कर्तुत्ववान सेवेमुळे* 
*जे. आर.  पवार उत्कृष्ट प्रशासक ठरले*
     .. माजी मंत्री बाळासाहेब थोरात





       बीड(प्रतिनिधी)

        आपल्या कामाप्रती निष्ठा, कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्ववान सेवा यामुळे आदरणीय जे.आर. पवार साहेब हे उत्कृष्ट प्रशासक ठरले आहेत. तसेच ते एक कुटुंब वत्सल व्यक्ती असल्यामुळे त्यांनी आपला गोतावळा जपून ठेवला असे गौरवोद्गार  राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब थोरात यांनी पिंपळा येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यामध्ये काढले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आस्थापनेतून कार्यकारी संचालक व कार्यकारी सल्लागार या पदावरून पवार साहेब नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या जन्मगावी पिंपळा येथे शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना मा.थोरात साहेब म्हणाले की पाथर्डी सारख्या दुष्काळी भागातील, तीन वर्षे बंद पडलेला वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांनी आपल्या कार्य कुशलतेने यशस्वीपणे आज तागायत चालवून दाखवला. वृद्धेश्वर चे सर्वेसर्वा राजळे कुटुंबाला पवार साहेब हे आपल्या कुटुंबापैकीच एक वाटतात. आणि त्यांच्या जन्मगाव पिंपळा परिसरातील लोकांनाही ते आपलेच वाटतात.

     सर्वच क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये नोकरदार वयाच्या 58 ते 60 वर्षापर्यंतच निवृत्त होतात. परंतु उत्कृष्ट प्रशासक या संज्ञेस पात्र असणारे पवार साहेब मात्र वयाच्या 71 व्या वर्षी वृद्धेश्वरच्या आस्थापनेतून निवृत्त होत आहेत असेही ते म्हणाले.

      यावेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे यांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवेचे कौतुक करून, त्यांच्या कामाची प्रशंसा केली. कारखान्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या समर्पित कार्यामुळे संस्था नेहमीच पुढे वाटचाल करीत राहील आणि श्री जे .आर. पवार साहेब यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

        शुक्रवार दिनांक 24:10:2025 रोजी वृद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व आस्थापनेचे कार्यकारी सल्लागार श्री जे. आर .पवार यांचा सेवा निवृत्ती सोहळा तसेच शंकरराव रामचंद्र पवार या त्यांच्या थोरल्या बंधूचा शताब्दी महोत्सव सोहळा आणि श्रीमती ताराबाई हरिभाऊ पवार या त्यांच्या वहिनीचा अमृत महोत्सव सोहळा अशा तीन कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. 

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार साहेबराव दरेकर हे होते. यावेळी बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी आष्टी तालुक्यातील बंद अवस्थेतील कडा सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालू करण्यासाठी सल्लागार म्हणून जे. आर .पवार साहेब यांनी सेवा द्यावी असा आग्रह बोलून दाखविला. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून सहकार्य करण्याचा मनोदय यावेळी जे. आर. पवार साहेब यांनी व्यक्त केला.

       यावेळी पद्मश्री पोपटराव पवार ,आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे ,माजी आमदार बाळासाहेब आजबे काका ,माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, युवा नेते सागर आप्पा धस ,श्रीमती सुशीला ताई मोराळे यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी वृद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ तसेच दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष इंजि.तानाजी बापू जंजिरे व सर्व कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार ॲड सीताराम पोकळे, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, पत्रकार अक्षय विधाते, युवा नेते प्रदीप थोरवे, सरपंच सावता ससाने, सरपंच संजय विधाते ,ह भ प राऊत महाराज ,ह भ प कराळे माऊली महाराज ,आरपीआयचे अध्यक्ष अशोक साळवे ,किसान सभेचे बबन आवटे ,डॉ. मधुकर हंबर्डे ,चीफ इंजिनिअर संदीपपान जाधव ,निवृत्त कार्यकारी संचालक हरिभाऊ मार्कंडे, सुखलाल मुथा, पं. स. माजी सदस्य संजय धायगुडे , कॅप्टन सहस्रबुद्धे,माजी सरपंच चंद्रकांत साके,पप्पू गवळी, मल्हार सेनेचे युवराज खटके ,समाजसेवक प्रा. दादा विधाते, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुहास चौधरी आणि बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील पवार साहेबावर प्रेम करणारे मान्यवर ,नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य टेमकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीमती विना दिघे यांनी केले .शेवटी सर्व उपस्थितांचे आभार युवा नेते प्रदीप थोरवे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.