पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
कडा (प्रतिनिधी) कडा ता.आष्टी जि.बीड येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यदअली सय्यद यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाचा मानाच्या समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाचा मानाचा समाजभुषण पुरस्कार देण्यात आला. अहिल्यानगर येथे ३० आँक्टोबर २०२५ रोजी माऊली संकुल सभागृह सावेडी येथे पार पडलेल्या समारंभात सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कालभक्त श्रीमहंत, डॉ.श्रीकांतदास धुमाळ महाराज उज्जैन, ग्रामसेवक नेते एकनाथ ढाकणे, यादवराव पावसे पाटील रोहीत पवार सह इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी त्यांच्या समाजसेवा व पत्रकारिता कार्याला समाजभूषण पुरस्कार प्रदान करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सईद शेख, सलमान सय्यद,साद शेख,अकिब खान,अल्तमश सय्यद सह आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यभरातून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ३२ जणांना पुरस्कार देण्यात आले. ज्या मध्ये बीड जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे जवळपास ३२ पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या सोबत आलेले मित्र, नातेवाईक यांचा हि सत्कार करण्यात आला म्हणजे सभागृहात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा फेटा बांधून सत्कार झाला.हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.रहेमान सय्यद यांना पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


stay connected