सायकर बंधुंनी सुरू केलेल्या बारामती हायड्रोलिक प्रा. ली. कंपनीचे उद्घाटन शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते संपन्न
बारामती ( प्रतिनिधी ) :- युवकांनो चिकाटी सोडू नका, कष्ट करण्याची तयारी ठेवा. कसलेही संकट आले तरी घाबरु नका काम करीत रहा यश निश्चित मिळते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ( श.प. गट ) अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री व खा. शरदचंद्र पवार यांनी बारामती येथे केले.
कर्जत तालुक्यातील राशीन येथील शिवकुमार सायकर व त्यांचे बंधु सुरेश सायकर यांनी बारामती येथे सुरू केलेल्या बारामती हायड्रोलिक प्रा. ली. कंपनीचे उद्घाटन जाणता राजा शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी सायकर बंधू व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेबांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना शरदचंद्र पवार यांनी सांगितले की, सुरुवातीला कारखाना सुरू केला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर दुध संघ काढला, दुधापासून उपपदार्थ बनवण्याचे काम सुरू केले. गोरगरिबांना शिक्षण मिळावे या हेतूने विद्या प्रतिष्ठान सुरू केले तसेच इंजिनिअरींग महाविद्यालये सुरू केली. आज या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक जाळं निर्माण केल्याने येथे शिक्षण घेऊन गेलेला विद्यार्थी देशात आणि देशाबाहेर कोठेही गेला तरी तो बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मध्ये शिक्षण घेतल्याचे सांगतो याचा अभिमान वाटतो.
शिवकुमार सायकर यांनी आज एक नविन प्रकल्प हाती घेतला आहे. तरुणांनी कामासाठी कोठेही जाण्याची तयारी ठेवावी. सायकर व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबईतील धारावी येथे १४०० लोकांना काम मिळत आहे असा हा पंधरा वर्षे चालेल एवढे मोठा प्रोजेक्ट दिला आहे. त्यामुळे हे भांडवल पहिल्या पाच वर्षांत वसुल होईल आणि आणखी नविन काहितरी करण्यासाठी भांडवल तयार होईल. देशात अनेक लोक असे आहेत की त्यांचा व माझा व्यक्तिगत संबंध आहे. त्यामुळे तुम्ही कामासाठी कोठेही जाण्याची तयारी पाहिजे.
चांगले काम करा. बारामतीच्या लोकांनी केले आहे असा चांगला संदेश देशात जाईल असे चांगले काम करा. कार्यक्रमास कर्जत, राशीन व बारामती परिसरातील अनेक अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------




stay connected