“आमदार व्हावेत म्हणून नवस” चिंचोली येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा नवसपुर्ती सोहळा
**************************
लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिभावाने पार पडणार सोहळा
**************************
*************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील चिंचोली एकशिंगे येथील श्री स्वामी समर्थ गडावर गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नवसपुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते आमदार सुरेश धस आमदार व्हावेत म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन दातीर यांनी केलेला नवस पूर्ण होत असून, त्या नवसाची पूर्तता म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास मराठवाडा भूषण, लोकनेते आमदार सुरेश धस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन सचिन भगवान दातीर यांनी अत्यंत श्रद्धा, भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केले आहे.
यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे पूजन, अभिषेक, आरती, नामस्मरण आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर स्नेहभोजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, शिरापुर-चिंचोली परिसरातील ग्रामस्थ, आ. सुरेश धस मित्र मंडळ, युवक वर्ग आणि महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सचिन दातीर यांनी केले आहे.




stay connected