*लोकशाही व्यवस्थेचा ऱ्हास*.
📚✍🏻
*युन्नूस तांबोळी, अकलूज,९८६०२६६४००*.
*अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सारख्या विचारसरणीमुळे जगाला हडेलहप्पीचे परिणाम भोगावे लागत आहे*.
*अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला महत्त्वाच्या क्षेत्रातील निर्णय करण्याचे व्यापक अधिकार आहेत, म्हणून या जागेवर निवडून आलेल्या नेतृत्वाला अतिशय जबाबदारीने निर्णय प्रक्रिया राबवावी लागते. मात्र असे होताना दिसत नाही*.
*ट्रम्पसारख्या उजव्या विचारसरणीने जगाच्या लोकशाहीत चिंता निर्माण केलेली आहे. जगातील अनेक देशात सुमार दर्जाच्या लोकांच्या हातात सत्ता सूत्र असल्याने सत्तेचा गैरवापर होताना दिसतो. यामुळे जगाच्या पातळीवर लोकशाही चिंतेत आहे, सत्ता हातात आल्या नंतर सर्व यंत्रणा स्वतःची नेतृत्व शाबूत राखण्यासाठी राबविली जाताना दिसत आहे. विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून केला जात असल्याचे दिसते.* .
*मागील निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना अमेरिकी संसदेवर हल्ला करण्याची चितावणी दिली होती. अशा विचारसरणीच्या लोकांना विरोधात बसणे जमत नाही. त्यांना विरोध नको असतो, विरोधमुक्त सत्ता यांनी हवी आहे स्वतःच्या अहंकारापुढे हे राष्ट्राचे किती नुकसान झाले तरी त्यांना देणे घेणे नसते*.
*अशा उजव्या विचारसरणी प्रवृत्तीमुळे पुतीन ,क्षी जिनपिंग यांना बळ मिळते. हे मंडळी लोकशाही मानत नाहीत, सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. यांचे विचार सत्तेभोवती फिरते. निरंकूश सत्ता ठेवणे एवढेच त्यांचे ध्येय असते.*.
*सत्तेचा गैरवापर करून आपल्या देश बांधवांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत यांची मजल असते. जनता जास्त दिवस अशा अन्यायाच्या गोष्टी सहन करत नसते. परंतु यातून लोकशाही व्यवस्था नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे एवढे मात्र नक्की*.


stay connected