उद्योगपती पती पत्नीने लाडक्या कन्येचा पहिला वाढदिवस शालेय सहित्य व फळे वाटप करुन केला साजरा

 उद्योगपती पती पत्नीने लाडक्या कन्येचा पहिला वाढदिवस शालेय सहित्य व फळे वाटप करुन केला साजरा


------------------




------------------

आष्टी (प्रतिनिधी) 

 आष्टी तालुक्यातील 

निमगाव बोडखा गावचे सुपुत्र सध्या पुणे शहरात नामांकीत उद्योजक म्हणून कार्यरत असलेले उद्योगपती  किरण तुकाराम गावडे आणि प्रगती किरण गावडे यांनी आपली कन्या सिया किरण गावडे (वय १ वर्षे) हिच्या प्रथम वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला.आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील श्री विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक   विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत पहिला वाढदिवस  साजरा केला. याप्रसंगी  निमगाव बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेतील आणि माध्यमिक  विद्यालयातील मुला मुलींना शालेय साहित्य,पेन, पेन्सिल,वह्या आणि फळे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच ईश्वरभाऊ मेटे, ग्रामपंचायत अधिकारी विकास गावडे, जि.प.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गावडे, राहुल गावडे, अशोक शेलार, शांतीलाल गावडे, शांतीलाल मेटे, सुशांत मेटे,सुनील गावडे,विवेक गावडे, संस्कार गावडे, अशोक मेटे,विराज गावडे,विवेक शिंदे, गणेश गावडे,उद्धव गावडे, तुकाराम गावडे, दादासाहेब गावडे, श्री विठ्ठल विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निमोणकर , शरद घुमरे ,सायंबर सर,जाधव सर, बोडखे सर, नालकोल सर,यादव सर, विधाते सर, राहुल गावडे सर,प्रा. माळशिकारे मॅडम, सविता हगारे, सोनाली गावडे, कानिफ वाळके, शिवाजी घोंगडे, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर,अमृते सर,अंगणवाडी सेविका शैलाताई गावडे, मदतनीस सोनाली मेटे,आरोग्य सेविका बेबीताई खान,जायदाबी खान व विद्यालयातील व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी  उपस्थित होते.हा कार्यक्रम  मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.युवा उद्योजक किरणभाऊ गावडे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या एक वर्षाच्या सियाचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

----------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.