शासकीय निवासी शाळा सामदा येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
सुनील शिरपुरे/यवतमाळ
अमरावती:दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर भूमिका अभिनय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. एनसीईआरटी अंतर्गत लोकसंख्या शिक्षण भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी "हिंसा व वैयक्तिक सुरक्षा" यावर भूमिका अभिनय सादरीकरण करून विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे राज्यस्तराकरिता संघ पात्र ठरला आहे. यामध्ये जयदीप टोबरे, नैतिक आठवले, देवा कोगे, प्रितेश बेलकर, ताशु तायडे या ९ व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर, मार्मिक आणि हृदयस्पर्शी सादरीकरण करून राज्यस्तरीय स्पर्धेकरीता संघ पात्र ठरवलेला आहे. मागील वर्षी सुद्धा भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. सलग दुस-या वर्षी विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे जाधव साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती, श्री कुबडे सर प्राचार्य डायट कॉलेज अमरावती, श्री काळे सर विशेष अधिकारी शानिशा अमरावती, श्रीमती एम के बोबडे मुख्याध्यापिका शासकीय निवासी शाळा सामदा, श्रीमती एस बी मोहोड सहायक शिक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.


stay connected