*पाटोद्यात बालाजी क्लाॅथ सेंटरचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*
पाटोदा *(गणेश शेवाळे)* पाटोदा शहरातील व्यापारी जगतात नवा अध्याय लिहित, बालाजी क्लाॅथ सेंटर या आकर्षक वस्त्रदालनाचे भव्य उद्घाटन शनिवारी उत्साहात संपन्न झाले.या सोहळ्याला परिसरातील मान्यवर, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ आणि युवा वर्गाची मोठी उपस्थिती लाभली.या उद्घाटन सोहळ्यास माजी राज्य मंत्री तथा आमदार सुरेश आण्णा धस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू, आणि ह.भ.प. राधाताई महाराज सानप या मान्यवर संतांचा पवित्र आशीर्वाद सोहळ्याला लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी प्रभावी शब्दांत केले, तर आभार प्रदर्शन बालाजी जाधव यांनी मानले.या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजात विश्वास निर्माण करणारे माध्यम आहे. बालाजी क्लाॅथ सेंटरसारखे नवे उपक्रम ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा देतील,” असे त्यांनी म्हटले. संतवचनांच्या ओव्यातून ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी प्रेक्षकांना समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेचे महत्त्व पटवून दिले. या उद्घाटन प्रसंगी परिसरातील व्यापारी, समाजसेवक, मित्रपरिवार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. बालाजी क्लाॅथ सेंटरमध्ये विविध प्रकारच्या नवनवीन डिझाईनचे कपडे, फॅशन वस्त्र आणि कौटुंबिक कलेक्शन उपलब्ध असून उद्घाटना निमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलतीची घोषणा करण्यात आली.


stay connected