तेजवार्ता दिपोत्सव २०२५ ह्या २२ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते संपन्न

 तेजवार्ता दिपोत्सव २०२५ ह्या २२ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते संपन्न

Tejwarta


आष्टी/धानोरा : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेवरून प्रकाशित होणाऱ्या तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या यंदाच्या २२ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत दिपोत्सवाच्या परंपरेला उजाळा मिळाला.



कार्यक्रमस्थळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तान्हाजी जंजीरे, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश गावडे, कृषीभूषण हनुमंत गावडे, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, कांतिलाल पानसरे, संपादक बबलूभाई सय्यद, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, पत्रकार जावेद पठाण, आष्टी चित्रचे संपादक यशवंत हंबर्डे, सचिन रानडे, अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, मारूती संत्रे, कॅमेरामन शेख हमजान आदी उपस्थित होते.

tej


२००३ मध्ये छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास — आज राज्याच्या नकाशावर - तेजवार्ता!


आष्टी तालुक्यातील धानोरा या छोट्याशा गावातून २००३ साली सुरू झालेली तेजवार्ता वृत्तसंस्था आज प्रिंट, युट्यूब चॅनल आणि डिजिटल न्यूज पोर्टलच्या माध्यमातून राज्यभर आपले स्पष्ट स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.


दररोजच्या घटना-घडामोडींचे वेगवान, परिणामकारक आणि जबाबदार वृत्तांकन करण्याचा तेजवार्ताचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो . दिवाळी अंकाची परंपरा जपण्याचा तेजवार्ताचा ध्यास आज २२ वर्षे पूर्ण करत आहे.



मुखपृष्ठाची रचना व गुणवत्तापूर्ण साहित्याचे आमदारांकडून कौतुक


दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ, आंतररचना, तसेच निवडक साहित्याबद्दल बोलताना आमदार सुरेश धस यांनी संपादक बबलूभाई सय्यद व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.

यासोबतच त्यांनी तेजवार्ताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यंदाच्या अंकाची वैशिष्ट्ये


राज्यातील विविध भागातील ख्यातनाम साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य


आकर्षक मुखपृष्ठ व सुबक मांडणी


प्रिंटसोबत डिजिटल स्वरूपातही ऑनलाइन उपलब्धता



संपादक बबलूभाई सय्यद यांनी सांगितले की, “वाचकांसाठी हा अंक प्रिंट आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमात उपलब्ध करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे वाचकांचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे.”



तेजवार्ताचा दिवाळी अंक — ग्रामीण बोली ते राज्याचा आवाज


धानोरा सारख्या गावात रुजलेली तेजवार्ताची लेखणी आज राज्यातील वाचकांचा विश्वसनीय आवाज ठरली आहे. दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त तेजवार्ता परिवाराने नव्या दशकातही सत्य, जबाबदारी आणि वेगळेपणाची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.