अवकाळी पावसामुळे कांद्या चे नुकसान : अनुदान न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
खाकाळवाडी / आष्टी -
आष्टी तालुक्यात मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी अनुदानापासुन वंचीत राहिले आहेत . तसेच कडा मंडळातील संपूर्ण गावे तसेच शेतकरी लक्ष्मण खंडु सापते, बबन मुक्ताजी पाचपुते व मंडळातील अनेक शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होऊन देखील. अनुदानापासुन वंचीत राहिले आहेत. कृषी विभाग व महसुल विभाग यांच्या संलग्न मताने व अवकाळी पावसामुळे अनेक मंडळातील शेतकरी अजुन पर्यंत लाभापासुन वंचीत आहेत. तसेच मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक, महसुल कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व पात्र शेतकरी यांना लवकरात लवकर लाभाचे वितरण करण्यात यावे तसेच मंडळातील शेतकरी वंचीत असुन लाभ न मिळाल्यास सर्व शेतकरी. कृषी ऑफीस जळगाव समोर उपोषनास बसणार असा ईशारा प्रविण सापते यांनी दिला आहे

stay connected