चिंचाळा येथे दिवाळी पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
आष्टी (प्रतिनिधी)
ह.भ.प. नवनाथ महाराज पोकळे (चिंचाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचाळा ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दिनांक 22 ऑक्टोबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे.हा धार्मिक सोहळा बाबासाहेब देवस्थान, महादेव मंदिर, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व संत वामनभाऊ मंदिर, चिंचाळा, ता. आष्टी, जि. बीड येथे होणार आहे सप्ताहाचे कलश पूजन नामधारक ह.भ.प. आसाराम महाराज (केळसांगवी) , ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे , ह.भ.प. परमेश्वर शास्त्री महाराज यांच्या हस्ते होणार आहे.या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण व संध्याकाळी कीर्तन, प्रवचन, हरिनाम संकीर्तन कार्यक्रम होणार आहेत. किर्तन रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत बुधवार दि. 22 नामधारक आसाराम महाराज( केळसांगवी) ,दि.23 ह .भ. प. नवनाथ महाराज पोकळे ( चिंचाळा), दि. 24 ह .भ .प .वेदिकाताई तावरे (खानापूर), दि. 25 ह. भ. प .अडसरे महाराज (कडा), दि. 26 ह .भ .प. चैतन्य महाराज शास्त्री (जुने गहिनाथ गड), दि. 27 ह. भ. प .कल्याण महाराज कोल्हे (महादेव दरा बीडसांगवी), दि. 28 ह. भ. प. रामकृष्ण रंधवे बापू (पाटोदा) तर
सप्ताहाचा समारोप बुधवार, दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.या वेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. काशीनाथ महाराज शास्त्री (सांगवीपाटण) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व तरुण मंडळ, चिंचाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.गावातील नागरिक, महिला मंडळ, युवक व संतप्रेमी भक्त मंडळींच्या सहकार्याने संपूर्ण चिंचाळा भक्तिमय वातावरणाने उजळून निघणार आहे.या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त चिंचाळा ग्रामस्थ व कार्यकारी मंडळ यांनी केले आहे


stay connected