आष्टी तालुक्यात पुणे येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
********************************
सामाजिक बांधिलकी जपत जैन श्रावक संघाची मानवतेचा संदेश
*******************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या महिन्यात आष्टी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आलेल्या प्रचंड पावसामुळे आणि अनपेक्षित पूरपरिस्थितीमुळे शेकडो शेतकऱ्यांचे घर, संसार, पिके आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, जीवन विस्कळीत झाले आणि दिवाळीच्या उंबरठ्यावर हतबलतेचे वातावरण पसरले.अशा परिस्थितीत या पूरग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी पुणे (चंदननगर) येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.
या दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे "दिवाळी गोड करा" या भावनेतून किराणा किट, साडी, ड्रेस मटेरियल, ब्लँकेट, आवश्यक वस्तू अशा विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजाच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या या संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला. पुण्यातील उद्योजक आणि जैन बांधवांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो” या उदात्त भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबवला.
आष्टी तालुक्यात आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी आष्टी, धामणगाव, खडकत, घाटापिंपरी या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शेकडो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अमित गुंदेचा, अनिल कांकरिया,सचिन गुंदेचा, निलेश रुणवाल, हर्षद लुनिया, परेश कटारिया, डॉ. योगेश कांकरिया, सागर रुणवाल आदी जैन श्रावळ संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मदतीबद्दल मराठवाडाभूषण लोकनेते आ.सुरेश आण्णा धस प्रतिष्ठान व गावकऱ्यांच्यावतीने जैन श्रावळ संघाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्यात आला.


stay connected