*स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची उद्या महत्वपुर्ण बैठक - गणेश बजगुडे पाटील
इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे
बीड / आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता शासकीय विश्रामगृह बीड याठिकाणी बीड तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक असुन काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे. या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भैया सोनवणे, बीड विधानसभा निरीक्षक अन्वर बापू देशमुख व काँग्रेस पक्षाचे आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी होवु घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला असुन त्याच पार्श्वभूमीवर बीड शहर व तालुका काँग्रेसची पुर्व तयारी बैठक दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१ वाजता बोलावली असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी कळवले आहे.


stay connected